Wednesday , March 4 2026
Breaking News

नवजात बालिकेला रुग्णालयात सोडून आईने काढला पळ; बालिकेचा मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : नवजात बालिकेला रुग्णालयात सोडून आईने पळ काढला आणि उपचार सुरू असलेल्या नवजात बालिकेचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना बेळगावातील बिम्स रुग्णालयात घडली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, बैलहोंगल येथील बीबीजान सद्धाम हुसेन सय्यद या महिलेला ८ डिसेंबर रोजी प्रसूतीसाठी बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र या नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून सदर महिलेने पळ काढला. सदर बालिकेवर उपचार सुरू असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी बिम्स रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा क्रमांक १६०/२०२४ नुसार, भारतीय दंड विधान कलम ९३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सध्या पोलीस या घटनेचा तपास करत असून बीबीजान सद्धाम सय्यद यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *