बेळगाव : दैनंदिन जीवनात नियमित योगअभ्यास व सूर्य नमस्कार केल्यामुळे जीवनशैलीत परिवर्तन होते तसेच अष्टांगयोगमुळे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी यामुळे साधना शक्ती वाढते असे प्रतिपादन योग प्रशिक्षक दीपक पानसरे यांनी समन्वित आयोजित शिक्षकांच्या योग शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उद्गार काढले.
अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात समविंत योग भारतीच्यावतीने दोन दिवशीय शिक्षकांच्या योग प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्याभारती राज्य अध्यक्ष परमेश्वर हेगडे, दीपक पानसारे, संपन्नमूळ व्यक्ती श्रीधर घुमाने, संतमीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, समन्वित योगाचे प्रमुख प्रशिक्षक मंजुनाथ संपत, वरिष्ठ प्रशिक्षण प्रमुख सुदर्शन बी. ओमकार, महेश जे. परशुराम कल्याणी, प्रकाश राठीमनी, श्री. स्वरूप बी, के., मंजुनाथ शिंदे, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्याचे हस्ते भारतमाता, ओमकार, सरस्वती फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले, सुजाता पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, पूजा मुचंडी, अनुराधा पुरी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तर संमित योग भारतीचे समन्वयक मंजुनाथ शिंदे यांनी प्रास्ताविक करीत समन्वित योगाचे कार्य त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर प्रमुख पाहुणे दीपक पानसरे, श्रीधर गोमाने, परमेश्वर हेगडे यांनी योग शिबिर याबद्दल व समन्वित योग यांनी राबवत असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती दिली व त्याचे महत्त्व सांगितले यानंतर समन्वित योग भारतीतर्फे अष्टांगयोगा, यामा, नियमा, शिबिरगीत, प्रश्नउत्तरे, क्रीडायोग, भजन, अवलोकन योगासन तांत्रिक सराव याबद्दल सविस्तर माहिती उपस्थित शिक्षकांना सांगितले दोन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरात बेंगलोर, म्हैसूर, धारवाड, शिरसी, खानापूर, चिक्कोडी, रामदुर्ग, निपाणी, व बेळगाव शहरातील विविध शाळेचे क्रीडा शिक्षक व शिक्षक या शिबीरात उपस्थित आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा कुलकर्णी तर सुजाता पाटील यांनी आभार मानले.