Monday , September 21 2026
Breaking News

मुगूळ ओढ्यामध्ये आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह

Spread the love

बेळगाव : घुमटमाळ, हिंदवाडी येथील प्रज्वल बसवराज महांतशेट्टी या बेपत्ता झालेल्या 24 वर्षीय युवकाचा मृतदेह येळ्ळूर शिवाराच्या हद्दीतील मुगूळ ओढ्यामध्ये गुडघाभर पाण्यात आढळला आहे.
बेळगाव शहरातील नामांकित डॉक्टर बसवराज सिद्धाप्पा महांतशेट्टी यांचा मुलगा प्रज्वल बसवराज महांतशेट्टी हा झाडशहापूर-मच्छे शिवार परिसरात बेपत्ता झाल्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली होती.
सायंकाळच्या सुमारास घरातून वॉकिंगसाठी जाणार असल्याचे सांगून तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर घरी परतला नसल्याने त्याच्या पालकांनी पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. येळ्ळूर शिवाराच्या हद्दीतील मुगूळ ओढ्यामध्ये गुडघाभर पाण्यात त्याचा मृतदेह आढळला आहे.

प्रज्वल बसवराज महांतशेट्टी हा डी फार्मसीचे शिक्षण घेत होता. तो मानसिकदृष्ट्या थोडा कमकुवत असल्याने त्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडे उपचार देखील सुरू होते, असे समजते. या घातपाताचा तपास पोलीस करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *