कोगनोळी फाट्यावरील घटना
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर चालत्या आयशरला आग लागल्याची घटना रविवार तारीख 13 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरातहून बेंगलोरला जात असलेल्या आयशर ट्रकला कोगनोळीजवळ असणाऱ्या दुधगंगा नदीजवळ अचानक आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी कोगनोळी फाट्यावर असणाऱ्या सेवा रस्त्यावर आणून सर्विसिंग सेंटर मधील पाण्याने आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. पण आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने आग आटोक्यात आली नाही. चालक व अन्य नागरिकांनी गाडी जळत असलेली सोडून लांब थांबले. आगीने रौद्ररूप धारण करुन ट्रकला चार बाजून मोठी आग लागली.
कागल नगरपालिका व निपाणी येथील अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. पण आयशर ट्रक व त्यामध्ये असणारे कपडे जळून खाक झाले होते. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महामार्गावर अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांसह वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली. कोगनोळी पोलिसांनी घटनास्थळी नागरिकांना लांब थांबवण्यासाठी बंदोबस्त ठेवला होता. आगीचे उग्र रूप पाहून पोलिसांनी अर्धा तास राष्ट्रीय महामार्ग बंद केला होता. घटनास्थळी पंचक्रोशीसह महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Check Also
सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याबाबत संजय मंडलिक यांचे महाराष्ट्र शासनाला पत्र
Spread the love निपाणी : येथे महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील बेरोजगार तरूणांसाठी शिवजयंतीचे औचित्य साधून रोजगार …