खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदाही ४१ वा हरिनाम सप्ताहाची सांगता रविवारी दि. १३ रोजी महाप्रसादाने झाली.
शुक्रवारी दि. ११ रोजी हभप शटवाप्पा पवार यांच्याहस्ते पोतीस्थापना होऊन सोहळ्याला प्रारंभ झाला. सायंकाळी प्रवचन, हरिजागर आदी कार्यक्रम झाले.
शनिवारी दि. १२ रोजी पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, गाथा भजन, नाम जप, रात्री प्रवचन आदी कार्यक्रम पार पडले.
तर रविवारी दि. १३ रोजी पहाटे काकड आरती होऊन गावातुन दिंडी सोहळा होऊन कालाकिर्तनंतर महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.
