कडोली : येथील मराठी साहित्य संघ आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यावतीने बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कडोलीतील श्री छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याजवळील साहित्य संघाच्या कार्यालयात ही स्पर्धा होईल.
स्पर्धेचे नियम व अटी अशा :
1) स्पर्धा शालेय गट (दहावी पर्यंत) आणि खुला गट अशा दोन गटात घेण्यात येईल.
2) कथाकथनासाठी शालेय गटासाठी 7 मिनिटे आणि खुल्या गटासाठी 10 मिनिटे वेळ दिला जाईल.
3) कथेसाठी विषयांचे बंधन नाही. मात्र कथा धार्मिक, राजकीय टीका किंवा अंधश्रद्धा पसरविणारी नसावी.
4) दोन्ही गटासाठी स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत.
5)स्पर्धेसाठी नाव नोंदणी ता. 24 डिसेंबर पर्यंत करणे आवश्यक आहे,
5) कोणालाही ऐनवेळी प्रवेश दिला जाणार नाही.
6) नाव नोंदणी तसेच अधिक माहितीसाठी बसवंत शहापूरकर (9900295200) किंवा अरुण पाटील (9448031361) यांच्याशी संपर्क साधावा.