बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शिष्टमंडळ व कार्यकर्त्यांची नागपूर अधिवेशनच्या विधान भवन येथे चंदगडचे आमदार श्री. शिवाजीराव पाटील यांच्या समन्वयक मदतीने सर्व मंत्र्यांची गाठभेट देण्यात आली. प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सीमा भागातील अडचणी सांगण्यात आल्या व सीमा भागातील समन्वयकपदी बेळगावच्या जवळीक असलेल्या आमदारांना देण्यात यावी ही मागणी करण्यात आली व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित सीमाप्रश्नाला लवकरात लवकर चालना द्यावी अशी मागणी प्रमुख्याने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली.
आतापर्यंतच्या वैद्यकीय कक्षातून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून शेकडो रुग्णांना मदत झाली त्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करण्यात आले व त्यांना सुद्धा सर्व सीमावासीयांच्या अडचणी सांगण्यात आल्या त्यांनी सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही मराठी बांधवांच्या पाठीशी राहू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.