बेळगाव : विधानसभेत काँग्रेस-भाजपच्या भांडणात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर याना अश्लील शब्द वापरल्याचा आरोप करत आज सुवर्णसौध येथे भाजपचे आमदार सी. टी रवी याना काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजपचे आमदार सी.टी. रवी यांनी स्वतः असा शब्द वापरला नाही. मी घाबरणारा राजकारणी नाही. असे सांगितले.
आज सभागृहात काँग्रेस-भाजपच्या चर्चेदरम्यान भाजप आमदार सी.टी. रवी यांच्यावर अश्लील भाषा वापरल्याचा आरोप करतकाँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार वादावादी झाली. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
माध्यमांशी बोलताना भाजप आमदार सी टी रवी यांनी मी कोणत्याही महिलांबद्दल अपशब्द वापरले नाही. राहुल गांधीविषयी देखील काही बोललेले नाही. जर मी असे काही बोललो असेल, तर त्याचा व्हिडिओ दाखवा. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसने विपर्यास केला असल्याचे मी म्हटले आहे. आंबेडकरांचा काँग्रेसने दोनदा निवडणुकीत पराभव केला होता. आंबेडकरांचे निधन झाले तेव्हाही काँग्रेसने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा दिली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर स्मारकही बांधले गेले नाही. सभापतींनी या सर्व बाबींचा उलगडा होऊ दिला नाही. काँग्रेसने लपवून ठेवलेला इतिहास आम्ही उघड करत आहोत. उत्तर कर्नाटकची चर्चा करताना त्यांनी विषयांतर करण्याचाही प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, मी काँग्रेस कार्यकर्त्यांना घाबरणारा नाही आणि मी राजकारणासाठी इथे नवा नाही,” असे सी.टी. रवि म्हणाले.