बेळगाव : बेळगावमध्ये सी. टी. रवी यांच्या अटकेविरोधात भाजपाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या नेतृत्वाखाली, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कलमध्ये आंदोलन छेडले.
आंदोलनादरम्यान काँग्रेस सरकारविरोधात जोरदार आरोप करण्यात आले आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर त्यांच्याविरोधात कठोर शब्दात टीका केली गेली. भा.ज.पा. कार्यकर्त्यांनी काँग्रेस सरकारला भ्रष्टाचारी ठरवले आणि पोलिसांच्या अत्याचारांना विरोध करत धिक्काराच्या घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान पोलिसांनी चन्नम्मा सर्कलमध्ये कडक बंदोबस्त ठेवला होता, परंतु कार्यकर्त्यांनी त्याला प्रतिकार केला. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी नुकतेच सुवर्णसौधसमोर निदर्शकांना फटकारले. त्यांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला. सुवर्णसौध येथे काँग्रेसच्या गुंडानी सी. टी. रवीवर हल्ला करण्याचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रात्री सी. टी. रवीला पोलिसांनी घेरले आणि अमानुषपणे मारहाण केली. हे काँग्रेसचे सरकार आहे की हिटलरचे सरकार आहे, असा सवाल त्यांनी केला.
विरोधी पक्षनेते पक्षनेते आर. अशोक यांनी म्हटले की, डिरेक्शन देऊन सी. टी. रवी यांच्यावर अत्याचार करून मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे जर काही चुकीचं केलं असेल, तर काँग्रेसने कारवाई केली पाहिजे. काँग्रेस काय करत आहे? पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. आम्ही मानवाधिकार आयोगात तक्रार करू. कमिशनरांना स्टेशनला येण्याचं अधिकार आहे का? मी स्टेशनला गेलो नसतो तर रवींचे काय झालं असते, ते माहित नाही. हे गुंडाराज आहे असे त्यांनी सांगितलं.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले कि , काँग्रेस सरकार कायम भाजपाच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार करत आहे. आज सी.टी. रवींवर अत्याचार झाला. पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. कर्नाटक सरकारने विधानसौधला गुंडगिरीसाठी वापरलं आहे. भाजपाच्या आमदारांना संरक्षण नाही, आम्ही राज्यात कसे चालायचे, असा सवाल त्यांनी केला.
आमदार अरविंद बेल्लद यांनी सांगितलं, “सी. टी. रवींवर हल्ला करणाऱ्यांना अजूनही अटक केली नाही. पण कायद्याचे रक्षक असलेले जनप्रतिनिधी सी. टी. रवींना गुन्हेगार म्हणून अटक केले आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले. सभापतींच्या आदेशाचे पालन न करता पोलिसांना बोलावून त्यांना सर्वांसमोर अटक केली.” या आंदोलनात माजी मंत्री, भाजपाचे नेते, आमदार, महिला कार्यकर्त्या, आणि इतर शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपला आक्रोश व्यक्त करत “काँग्रेस सरकार” आणि “गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांवर” आरोप केले.