
बेळगाव : येणाऱ्या रविवार दिनांक 22.12.24 रोजी होणाऱ्या मराठा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला चव्हाट गल्ली च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला व गल्लीत प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीमध्ये गल्लीतील पंचमंडळ, महिलावर्ग ,युवावर्ग व सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हलगी चा वाद्य आणि फटाक्यांची आतिशबाजी चा जल्लोषात प्रचार फेरी पार पडली.गल्लीच्या वतीने श्री जालगार मारुती कार्यालय येथे सभा घेण्यात आली व त्या सभेत गल्लीच्या पंचमंडळीच्या वतीने जाहीर पाठिंबा करण्यात आला व येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलला नक्कीच निवडून येण्याकरिता चव्हाट गल्ली रहिवासी सक्षमपणे उभे राहतील असे जाहीर केले.
Belgaum Varta Belgaum Varta