

येळ्ळूर : ८६५ सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंचच्या वतीने रविवार दि. २२ रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेची तयारी पूर्ण झाली असुन याबाबतची बैठक शनिवार दि. २१ रोजी येळ्ळूर केंद्रावर घेण्यात आली. परीक्षा ठीक १२ ते २ या वेळेन होणार असल्याने सर्व परीक्षार्थीनी वेळेचे बंधन पाळावे असे यावेळी मंचच्या पदाधिकाऱ्यानी सांगितले.
मुलाच्या भविष्याबद्दल काळजी असून ही आपण त्यांना म्हणावा तेवढा वेळ देऊ शकत नाही अशी ग्रामीण भागातील मराठी पालकांची आजची स्थिती आहे. बालवयातच स्पर्धा परीक्षेचा सराव करून घेत पुढील परीक्षांची तयारी करून आमच्या पाल्यांच्या भविष्यासाठी धडपडणाऱ्या या मंचाला आमचे नेहमीच सहकार्य राहिल, असे मत यावेळी पालकानी व्यक्त केले. येळ्ळूर येथील सपर्धा परीक्षा केंद्रासाठी उद्घाटन कार्यक्रमाला सातारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य शामराव पाटील हे अध्यक्षस्थानी असणार असुन मराठा संघटक प्रकाश मरगाळे व चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव राजेंद्र मुतकेकर हे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणुन उपस्थित रहाणार आहेत. यावेळी एस. डी. एम. सी. सदस्य मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग उपस्थित राहणार आहेत.
या परीक्षेसाठी आता पर्यंत ५८० परीक्षार्थिनी आपला सहभाग नोंदवला असुन यावेळी उद्योजक संजय बेळगावकर, नवहिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, पत्रकार सी एम गोरल, बी एन मजुकर, नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर, बिल्डर डेव्हलपर सतिश पाटील, दुदाप्पा बागेवाडी, सामाजिक कार्यकर्ते दत्ता उघाडे, महेश जुवेकर, मुख्याधयापक बबन कानशिडे, पी वाय गोरल उपस्थित राहणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta