Saturday , March 7 2026
Breaking News

केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या वक्तव्याविरोधात दलित संघर्ष समितीच्यावतीने निषेध

Spread the love

 

बेळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधातील वक्तव्याचा होन्नीहाळ येथील दलित संघर्ष समितीने निषेध नोंदवला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत माफी मागण्याची मागणी केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात दिलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत होन्नीहाळ येथील दलित संघर्ष समितीच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. आज झालेल्या या आंदोलनात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे, अमित शहा यांनी आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर गुडघे टेकून माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री पदावर असताना संविधानाचे पालन करण्याची जबाबदारी शहा यांची आहे. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान आणि त्याद्वारे केलेले समतासंविधानाचे कार्य भाजप, आरएसएस आणि संघ परिवार विसरल्याचे या आंदोलनातून निदर्शनास आणले. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अमित शहा यांनी माफी मागेपर्यंत हा लढा सुरू राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात जिल्हा संयोजक गुंडू तळवार, गिरेप्पा कोळकार, आनंद कांबळे, मारुती मोठे लक्कप्पगोळ, मल्लिकार्जुन कोळदूर, अंबिका चलवाडी, अनीता शिवराई, सावित्री मादार, द्राक्षायिणी कांबळे यांच्यासह इतर अनेक आंदोलक सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

कलखांब गावच्या राहुल पाटीलचे युपीएससी परीक्षेत दुसऱ्यांदा यश; 224 वा क्रमांक

Spread the love  बेळगाव : बेळगाव जवळील कलखांब गावच्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *