बेळगाव : खादरवाडी गावच्या बकापाच्या वारीला काही अज्ञात समाजकंटकांनी आग लावून जनावरांच्या चाऱ्याचे, शेत पिकाचे शेतकऱ्यांच्या काजू, आंब्याच्या बागांचे लाखो रुपयाचे नुकसान केले ही बातमी गावात समजतात सर्व शेतकरी व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि गावातील नागरिकांनी घटनास्थळी जाऊन आग लागलेली त्या ठिकाणची पाहणी केली. या आगीत शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मिळावी अशी मागणी शेतकरी सेनेचे प्रमुख राकेश पाटील यांनी केले. त्याचबरोबर राजू पाटील, लक्ष्मण पाटील, आकाश पाटील, विशाल पाटील, भूषण पाटील, भाऊराव पाटील, मनोहर पाटील, प्रल्हाद कामती, विष्णू पिंगट व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी समाजकंटकाने केलेल्या कृत्याचा गावकऱ्यांनी जाहीर निषेध केला आणि अश्या प्रकारे मुक्या जनावराच्या चाऱ्याची नासदुस करू नये अशी विनंती केली. ज्या वेळेला बक्कापाच्या वारीला आग लावण्यात आलेली त्यावेळेला गावातील शेतकरी कोणी उपस्थित नव्हते जाणून बुजून बकापाच्या वारीला आग लावून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप देखील खादरवाडी ग्रामस्थ करीत आहेत.