बेळगाव : काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित “गांधी भारत” कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना २६ आणि २७ डिसेंबर रोजी सुटी जाहीर केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
उद्यापासून दोन दिवस “गांधी भारत” कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच बेळगाव शहर व ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.