राजू पोवार; आंदोलन तात्पुरते स्थगित
निपाणी(वार्ता) : डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करावी.शेतकऱ्यांची कर्जमाफीसह कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्यांवर बंदी आणावी, ऊसाला योग्य दर द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी
बेळगांव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रयत संघटनेचे आमरण उपोषण सुरु होते. पण भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्यामुळे रयत संघटनेचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. शिवाय मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. सोमवारी (२० जानेवारी) साखर मंत्री शिवानंद पाटील यांच्या घरासमोर रयत संघटनेचे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे कर्नाटक राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी सांगितले.
ग्रामीण भागात शेतीसाठी १२ तास श्रीफेज आणि रात्री सिंगल फेज वीजपुरवठा करावा, शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यात यावेत, यासह विविध मागण्या साठी हे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तो पर्यंत रयत संघटनेचे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे राजू पोवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिलेल्या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. शिवाय शासन दरबारी आपल्या समस्यांचा पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. यावेळी संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी, प्रकाश नाईक, सुरेश परगन्नावर, किसान नंदी, संगमेश्वर, पांडुरंग बिरणगड्डी, संजू हवन्नावर, जावेद मुल्ला, यल्लाप्पा चिन्नापूर, दशरथ नायक, श्रीनिवासगौडा पाटील, इराप्पा दळवाई, रमेश पाटील, बबन जामदार, सर्जेराव हेगडे मयुर पोवार यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.