
बेळगाव : दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण असल्याने या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेचे तंत्र माहिती होणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने बाळगोपाळ कंपनीतर्फे दहावी विद्यार्थ्यांसाठी बाळगोपाळ एसएसएलसी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला दमशिमं संचलित व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छे येथे दर रविवारी होणार आहे. या व्याख्यानमालेत विविध विषयातील तज्ज्ञ शिक्षकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. व्याख्यानमाला दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे. सध्या दहावीतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली असल्यामुळे व्याख्यानमालेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. ही व्याख्यानमाला दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना खुली असून मच्छे, पिरनवाडी, खादरवाडी, संतीबस्तवाड, वाघवडे, रणकुंडये, किणये आणि परिसरातील विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाळगोपाळ कंपनीचे संचालक प्रा. डॉ. गोपाळ पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta