
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांनी कन्नड शासकीय प्राथमिक शाळा, मन्नूर यांना वॉटर प्युरिफायरची मदत केले. हे उदार योगदान रो. आशा पोतादार यांच्याकडूून केले गेले. आदरणीय जिल्हा गव्हर्नर रो. शरद पै यांच्या हस्ते औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आले. तसेच राज्यपाल रो. ॲड. महेश बेल्लद यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
हा उपक्रम विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि कल्याण वाढविण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी पुरविण्याची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो, समाजाच्या उज्ज्वल आणि आरोग्यदायी भविष्यासाठी योगदान देतो.
कार्यक्रमाचे स्वागत कन्नड शासकीय प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी केले. जिल्हा गव्हर्नर रो. शरद पै म्हणाले, अशा दानशूर व्यक्तींच्या मुळेच समाजात चांंगले बदल घडवून आणायला रोटरीला मदत होते. रोटरी क्लब ऑफ बेळगांव दर्पणच्या अध्यक्षा रो. रुपाली जनाज, सचिव रो. शीतल चिलमी, रो. सुरेखा मुम्मीगट्टी, एजी रो. पुष्पा पर्वतराव, कन्नड शासकीय प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. यशोधा केंद्री यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta