बेळगाव : नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान सरत्या वर्षाच्या नकारात्मक घटना आणि क्लेश यांचा ओल्डमॅन दहन करून नष्ट करीत नवीन संकल्पनांमध्ये नवीन वर्षाला सुरुवात केली जाते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लहानांपासून तर तरुणाईदेखील ओल्डमॅन तयार करण्यात व्यस्त असते. मात्र आधुनिक तंत्रज्ञान आणि शहरांच्या जीवनशैलीत याला थोडासा वेळ मिळणे कठीण आहे. त्यामुळे स्मार्ट युगातही ओल्डमॅनला ऑर्डर देऊन तयार केले जाते. बेळगावच्या कॅम्प परिसरात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये ओल्डमॅन बाजारपेठ सुरू होते. येथे 10, 11 आणि 15 फूट पर्यंतचे ओल्डमॅन तयार केले जातात. बेळगावातील विविध जिल्हे, महाराष्ट्र, गोवा यासह अन्य राज्यांमधूनही ऑर्डर दिली जाते. रुपये एक हजार ते दहा हजारांपर्यंतचे ओल्डमॅन येथे उपलब्ध होतात.