
बेळगाव : आश्रय कॉलनी नानावाडी येथे श्री अय्यप्पा सेवा समिती ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 53 वार्षिक श्री अय्यप्पा पूजा महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
या महोत्सवाअंतर्गत दि. 22 रोजी ध्वजारोहण झाले. दि.22 ते 27 डिसेंबर पर्यंत रोज पूजा, विशेष पूजा, खास पूजा आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच तालपोली मिरवणूक, दीपराधना, प्रसाद वाटप आणि हरीवरसानम संपन्न झाले.
28 डिसेंबर रोजी महापूजेचे आयोजन करण्यात आले होते या दिवशी उषा पूजा, स्पेशल पूजा, अर्चना, भक्ती गीत गायन याबरोबरच सायंकाळी तालपोलि मिरवणूक संपन्न झाली. यामध्ये कन्नूर, केरळा इथून आलेल्या भक्तांचे स्वागत मिलिटरी महादेव मंदिर पासून करण्यात आले. तिथून ते सर्वजण आयप्पा मंदिरापर्यंत पोहोचल्यावर तिथे दीपराधना आणि प्रसाद वितरणाचे कार्यक्रम झाले. मुख्य कार्यक्रम 29 डिसेंबर रोजी संपन्न झाला सकाळी पूजा, पडी पूजा झाल्यावर ध्वज उतरणे आणि सर्वांसाठी महाप्रसाद झाला. अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.
या महोत्सवात रोज शेकडो नागरिक सहभागी झाले. खास करून तालपोली मिरवणुकीत वाद्यवृंदासह नागरिक सहभागी झाले.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी अनेक नागरिकांनी देणगी रूपाने मदत केली त्याबद्दल कमिटीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
22 डिसेंबरपासून 28 डिसेंबर पर्यंत रोज अनेक कुटुंबे व संस्थांच्या वतीने पूजा करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta