Sunday , July 26 2026
Breaking News

अखेर सुळगा-देसूर रस्त्याला सुरुवात; गोविंद टक्केकरांचा पाठपुरावा

Spread the love

 

बेळगाव : दक्षिण भागातील महत्त्वाचा असलेल्या सुळगा-देसूर रस्त्याची दुर्दशा झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर या रस्त्याचे काम सुरु झाल्याने परिसरातील ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे.

सुळगा-देसूर रस्त्याची पावसाळ्यात दूरवस्था झाली होती. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. हा रस्ता दुरुस्त करावा, या मागणीचे निवेदन मंत्री हेब्बाळकर यांना देण्यात आले होते. पण, या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळत नसल्याने दोन महिन्यांपूर्वी टक्केकर यांनी रस्ता दुरुस्तीसाठी स्वतः पुढाकार घेतला होता. त्यांनी मित्रांच्या साहाय्याने स्वखर्चातून मुरुम आणून खड्डे बुजविले होते. त्यामुळे, तात्पुरती समस्या मार्गी लागली होती.

राजहंसगड पर्यटनस्थळ असल्याने या मार्गावर वर्दळ वाढली आहे. या मार्गावर नंदिहळ्ळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी तसेच पुढे देसूरजवळ बेळगाव-खानापूर रोड लागत असल्याने वडगाव, यरमाळ, धामणे, हलगा बस्तवाडमधील लोक ये-जा करतात. धोकादायक बनलेल्या या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी होत होती. मंत्री हेब्बाळकर यांनी रस्ता कामाला सुरुवात केल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *