
बेळगाव : येथील सदाशिवनगर येथील रहिवासी डॉ. हर्षा अष्टेकर यांना मंगळुरू निट्टे विद्यापीठाकडून फार्माकोलॉजीमध्ये पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. पार्किन्सन्स रोगाच्या उपचारात पायराझोलोन डेरिव्हेटिव्ह्जचे डिझाइन डेव्हलपमेंट हा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम त्यांनी निवडला होता. डॉ. हर्षा यांचे शालेय शिक्षण महिला विद्यालय मराठी माध्यमातून झाले असून मराठा मंडळ फार्मसी कॉलेजमधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
लहानपणापासूनच हर्षा या एक हुशार विद्यार्थीनी म्हणून परिचित होत्या. खडतर मेहनत आणि ध्येयाचा पाठपुरावा करून तिने पीएचडी मिळविली आहे. त्यांना पीएचडी मिळवण्यासाठी डॉ. निम्मी वर्गीस यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
डॉ. हर्षा यांनी पार्किन्सन रोगाच्या उपचारासाठी पायराझोलोन रेणूंवर पेटंटसाठी अर्ज केला आहे. या संशोधनासाठी निट्टे विद्यापीठाकडून त्यांना चार लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
पीएचडी मिळवल्याने सगळीकडे त्यांचे कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या त्यांच्या कौतुकास्पद यशाचे सारे श्रेय त्यांची आई रूपा अष्टेकर यांना देते.

Belgaum Varta Belgaum Varta