बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने कुस्ती आखाडा रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी भरवण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले.
मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे बेळगावच्या आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात येते. यावर्षी रविवार दि. 9 जानेवारी 2022 रोजी भरवण्यात येणार होता पण राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यामुळे सदर आखाडा पुढे ढकलण्यात आला. पुन्हा आखाडा येत्या रविवार दि. 27 फेब्रुवारी रोजी भरवण्यात येणार असल्याचे कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बेळगाव परिसरातील कुस्तीगीर आणि कुस्ती शौकिनांना आनंदवाडी येथील रविवारच्या कुस्ती मैदानाचे वेध लागले आहेत.
या बैठकीला अध्यक्ष मारुती घाडी यांच्यासह नवरतन सिंग पनवार, हिरालाल चव्हाण, संतोष होंगल, वैभव खाडे, प्रमोद जाधव, अजित नाईक, विनोद कणबर्गी, महेश नाईक, गणेश नाईक, लक्ष्मण बाळेकुंद्री, विनायक चौगुले आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta