
बेळगाव : आगामी 14, 15 आणि 16 जानेवारी रोजी बेळगाव येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठांच्या शरीरसौष्ठव स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन समितीचे सह चेअरमन पद स्वीकारावे अशी विनंती बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांना करण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन समिती चेअरमन म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याआधीच सहमती दर्शवली आहे. पोलीस आयुक्त मार्टिन यांनी सदर बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असून आपण सह चेअरमन पदाला सहमती दर्शवली आणि स्पर्धा यशस्वी करण्याची ग्वाही दिली. यावेळी केएबीबीचे अध्यक्ष अजित सिद्धनावर, मिस्टर इंडिया रेल्वे अधिकारी सुनील आपटेकर यांनी स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव पदाधिकारी गंगाधर, हेमंत हावळ, सुनील पवार, विकास कलगटगी आणि प्रकाश कालकुंद्रीकर उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta