
बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती व राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या विज्ञान शिक्षिका सविता पवार उपस्थित होत्या. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ओवी सादर केली व हे विद्यार्थी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या पारंपारिक वेशभूषेमध्ये उपस्थित होते. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सचित्र प्रदर्शनही भरविण्यात आले होते. या उपक्रमाचे आयोजन वर्ग प्रमुख कमल हलगेकर यांनी केले. प्रमुख वक्त्या सविता पवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. उपक्रम यशस्वी करण्यासाठी दीप्ती कुलकर्णी, जयश्री पाटील, शैला पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी मुख्याध्यापक गजानन सावंत सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. अद्विता गुंजीकर हिने केले व आभार कु. शौर्य पाटील यांने मानले.

Belgaum Varta Belgaum Varta