बेळगाव : आज तिसऱ्या प्रथम दर्जा सत्र न्यायालयाने (जेएमएफसी lll) १ नोव्हेंबर २०१६ रोजी काळ्या दिनाच्या खटल्यातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी निर्दोष मुक्तता केली.
१ नोव्हेंबर रोजी सायकल फेरीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काकेरू चौक शहापूर येथे राज्योत्सवानिमित्त लावण्यात आलेली लाल पिवळ्या पताका व लाल पिवळा झेंडा फाडणे, कर्नाटक सरकार विरुद्ध घोषणा देणे, महाराष्ट्राच्या समर्थनात घोषणा देणे, दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणे, तसेच गोवावेस येथील अमर एम्पायर या इमारतीवर दगडफेक करून मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे तत्कालीन शहापूर पोलीस निरीक्षक श्री. लक्कन्नवर यांनी नोंदविले होते. पण सरकारला गुन्हा शाबीत करता आला नाही त्यामुळे आज मा. न्यायालयाने सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली.
निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम, तालुका समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, दत्ता येळ्ळूरकर, बापू भडांगे, सतीश कुगजी, रामचंद्र पाटील, महेश पाटील, राहुल कुरणे, राहुल पाटील, महेश पाटील, यशोधन नेसरकर, सचिन पाटील, सचिन कदम, विक्रम मुतगेकर, मनोहर काकतकर, संतोष बांडगी, लोकनाथ रजपूत, रोशन पाटील, सुरज शिंदोळकर, राघवेंद्र येळ्ळूरकर, गजानन पोटे, संदीप मोटेकर, श्रीनिवास पोळ, राजन मजुकर, रवी मजुकर, सार्थक मास्तमर्डी, स्वप्नील देसाई, जयदीप उपसकर, चांगदेव मुचंडिकर, संतोष मुचंडीकर, भुजंग लाड, षण्मुख चोपडे, राजू हित्तलमनी, शंकर जाधव, इंद्रजित पाटील, संदीप कडेमनी, सुशांत रेडेकर, राहुल पाटील हे आहेत.
सर्वांच्या वतीने ॲड. महेश बिर्जे, ॲड. प्रताप यादव, ॲड एम. बी. बोंद्रे, ॲड. रिचमॅन रिकी नवग्रह, ॲड. बाळासाहेब कागणकर, ॲड. वैभव कुट्रे यांनी कामकाज पाहिले.