
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये 2018-19 या आर्थिक वर्षात 14 वा वित्त आयोग योजनेंतर्गत विविध विकासकामे राबविण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत पंचायत राज खाते व कर्नाटक लोकायुक्ताकडे तक्रार देण्यात आली होती. अद्याप कोणतीही कारवाही झाली नाही. यासाठी पुन्हा एकदा येळ्ळूर ग्राम पंचायतच्या भ्रष्टाचाराबद्दल जिल्हा पंचायत सीईओंकडे तक्रार दाखल करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. येळ्ळूर ग्राम पंचायतचे उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष व सदस्यांनी हे भ्रष्टाचाराचे बिंग लोकांसमोर आणला आहे. येळ्ळूर ग्राम पंचायतला जो निधी उपलब्ध झाला होता याचा उपयोग गावाच्या विकासासाठी झाला पाहिजे या उद्देशाने हा धाडसी निर्णय या सदस्यांनी घेतला आहे. जेणेकरून गावचे नुकसान होऊ नये.

यावेळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष सतीश बा. पाटील, सदस्य शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे, परशराम परीट, शालन पाटील, मनीषा घाडी, लक्षण छत्रयांनावर, ऍड. सुरेश उगारे उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta