Friday , January 10 2025
Breaking News

या वर्षीचा रोटरीचा “उत्तम व्यावसायिक अभियंता” पुरस्कार श्री. आर. एम. चौगुले यांना बहाल!

Spread the love

 

बेळगाव : कोणताही व्यवसाय करताना प्रामाणिकपणा व पारदर्शकपणा जपला तर तो अधिक वृद्धिंगत होतो हा सर्वसामान्य अनुभव आहे. याच व्यावसायिकतेच्या जोडीला समाज सेवेची किणार लाभली तर तो व्यवसाय समाजाभिमुख होतो आणि ही सामाजिक जाणीव अनेकांच्या आधाराचे केंद्र बनते!
श्रीयुत आर. एम. चौगुले यांनी आजवर आपल्या व्यवसायात अनेक मानांकनं प्राप्त केली आहेत. गेली दोन दशके ते गरजूबरोबर धनदांडग्यांना अलिशान घरकुल बांधून देत आले आहेत. आपल्या “आर एम आसोशियेटस” व “वननेस बिलियर्डस् अ‍ॅन्ड डेव्हलपर्स” या फर्मच्या माध्यमातून त्यांनी घरकुल, हाॅस्पिटल, हाॅटेल्स, कल्यान मंटप या सारखे मोठ मोठे प्रकल्प उभे केले आहेत. हे करत असताना त्यांनी नेहमीच समाजिक भान ठेवला आहे म्हणूनच गोरगरीब विद्यार्थी वा जनता असेल त्यांना मदतीचा न दिसणारा सढळ हात पुढे केला आहे. आजवर आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या अनेक रूग्णांना व आर्थिक विवंचनेत असणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांनी त्यांना मोठा दिलासा तर दिला आहेच शिवाय मोठा आर्थिक भार ही उचलला आहे. श्रीयुत आर. एम. चौगुले फक्त अर्थ सहाय्य देवून न थांबता आपल्या व्यस्त कामातून थोडा वेळ काढून गरजवंता सोबत घालवतात, त्यांच्या सोबतीला नेहमीच त्याग, सेवा आणि समर्पण या तीन गोष्टी असतात.
म्हणूनच आज बेळगाव शहर आणि तालुका त्यांच्याकडे मोठ्या आशेने पाहतो आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बाबींचा सारासार विचार करून समाजाभिमुख उपक्रम राबविणाऱ्या रोटरी क्लब बेळगाव या संघटनेने त्यांना या वर्षीचा उत्तम व्यावसायिक अभियंता हा मानाचा पुरस्कार देऊन श्री आर. एम. चौगुले यांना सन्मानित केले.
आदर्श पॅलेस सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात रोटरी क्लब इलाट बेळगावचे प्रेसिडेंट श्री सचिन हंगीरकर, सचिव श्री विशाल मुरकुंबी व उच्च पदाधिकारी सौ. पुष्पा पर्वतीराव हे उपस्थित होते. या पुरस्कारामुळे जनतेची सेवा पुन्हा मोठ्या तडफेने करण्याचा मानस श्री आर. एम. चौगुले यांनी नकळत व्यक्त केला!

About Belgaum Varta

Check Also

बेळगावचे डायव्हिंगपटू मयुरेश जाधव, युवराज मोहनगेकर यांना सुवर्ण

Spread the love  बेळगाव : नुकत्याच चेन्नई येथील वेल्हाचेरी जलतरण तलावात “35 व्या साउथझोन अक्वेटिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *