बेळगाव : युवा दिनी आयोजित युवा मेळाव्याला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा आणि मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा दिनाचे औचित्य साधून युवा मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी मराठा सांस्कृतिक भवन, महात्मा फुले रोड शहापूर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे व आमदार रोहित आर. आर. पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी सदर युवा मेळाव्याला महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करीत आहोत तसेच मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवा मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, उपाध्यक्ष गुंडू कदम, वासू सामजी, सिद्धार्थ चौगुले, खजिनदार विनायक कावळे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.