हारुगेरी : उसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याची घटना रायबाग तालुक्यातील हारुगेरी शहरात शुक्रवारी सकाळी घडली.
साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला. हारुगेरी-रायबाग मार्गावरील संगोळी रायण्णा सर्कलजवळ ही घटना घडली, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रॅक्टर चालकाचा निष्काळजीपणा या घटनेला कारणीभूत असल्याचे उघड झाले असून, हारुगेरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्यावर पडलेला ऊस हलवला.
Belgaum Varta Belgaum Varta