बेळगाव : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने 21 नोव्हेंबर रोजी गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सुरू झालेली पालखी परिक्रमा महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून 13 जानेवारी रोजी रात्री बेळगावात येत आहे.
पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम हट्टीहोळ गल्ली, शहापूर येथे राहणार असून 14 जानेवारीला दत्त मंदिर वडगाव येथील परिक्रमेनंतर पालखी आदेश बर्डे यांच्या गुडशेड रोड येथील निवासस्थानी मुक्कामास राहील.
15 जानेवारी रोजी संत गाडगेबाबा भवनात जाऊन पालखी महाद्वार रोड येथील स्वामी समर्थ आराधना केंद्रात मुक्कामला येईल. त्यानंतर 16 जानेवारी रोजी तेथून पालखी ओमनगर ला जाऊन पिरणवाडीत मुक्काम होईल. 17 जानेवारी रोजी सह्याद्री नगरला जाऊन नक्षत्र कॉलनी येथे विकास बर्डे यांच्या घरी मुक्कामाला राहील आणि 18 जानेवारी रोजी पालखी कडोलकर गल्लीत जाऊन तेथे मुकामला राहील.
अशाप्रकारे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथे परिक्रमा करून पालखी 26 जून रोजी पुन्हा अक्कलकोटला परत जाणार आहे. यंदाचे हे 28 वे वर्ष आहे. या सर्व ठिकाणी भाविकांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घ्यावे असे आवाहन संबंधिताणि केले आहे.