बेळगाव : श्री ब्रह्मलिंग प्राथमिक कृषी पत्तीन सहकार संघ नियमित निलजी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध ठरली. अध्यक्ष म्हणून श्री. मल्लाप्पा गोविंद गाडेकर तर उपाध्यक्षपदी सौ. सुशीला भाऊसाहेब मोदगेकर यांची फेरनिवड झाली आहे.
श्री ब्रह्मलिंग पीकेपीएसने यंदाच्या निवडणुकीत देखील आपली बिनविरोधाची प्रथा कायम ठेवली असून खेळीमेळीच्या झालेल्या या निवडणुकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बिनविरोध करण्याचे ठरले. संचालक मंडळावर शिवराम देसाई, गजानन म्हाळोजी, किरण मोदगेकर, विजय पाटील, बसवंत पाटील, रेश्मा गोमाणाचे, दीपक केतकर, निशिगंधा सुतार, वसंत सुतार यांचीही सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta