
बेळगाव : गुरुवारी वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विद्यानिकेतन येथे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाला सीमाभागातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. या व्याख्यानमालेला मार्गदर्शक म्हणून अप्पर आयुक्त जी. एस. टी. विभाग बेळगावचे आय. आर. एस आकाश चौगुले व कोल्हापूरच्या विद्याप्रबोधिनीचे संचालक श्री. राजकुमार पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर, मुख्याध्यापक नारायण उडकेकर, इंद्रजीत मोरे उपस्थित होते. स्वागत सुभाष ओऊळकर यांनी केले. प्रास्ताविक इंद्रजीत मोरे यांनी केले. जयंत नार्वेकर यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर श्री. आकाश चौगुले व राजकुमार पाटील यांनी चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दहावीनंतर कशाप्रकारे करिअर निवडावे, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कशाप्रकारे तयारी करावी, अभ्यासाचे नियोजन, अवांतर वाचन, त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन या सर्व गोष्टींचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विविध शाळातील 170 विद्यार्थी या व्याख्यानाला उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनीतीतर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून विद्यार्थ्यांना सातत्याने स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक शाखांचे मार्गदर्शन मिळवून देण्याचे ठरविण्यात आले. दर महिन्यातून एकदा विद्यार्थ्यांच्या अभ्यास गट स्थापन करून मान्यवरांना बोलवून विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणण्याचे ठरले. यासाठी आय आर एस आकाश चौगुले यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यापुढेही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सातत्याने होत राहणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रबोधिनीचे सदस्य ज्योती मजुकर, गौरी चौगुले, बी.बी. शिंदे, डी एस मुतगेकर, गजानन सावंत, प्रसाद सावंत, धीरजसिंह राजपूत यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स्नेहल पोटे व आभार विद्यार्थिनी संस्कृती गुरव हिने व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta