Tuesday , March 3 2026
Breaking News

युवा आघाडीतर्फे उद्या सैन्यात भरती झालेल्या जवांनाचा सत्कार

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने उद्या बुधवार दिनांक १५ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर मंगल कार्यालय (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे भारतीय सैन्य दलामध्ये नव्याने रुजू झालेल्या तरुण, तरुणींचा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
तरी या सत्कार समारंभाला बेळगाव तालुक्यातील भारतीय सैन्य दलात दाखल झालेल्या नव्या तरुण मंडळींनी वेळेवर उपस्थित रहावे, तसेच या कार्यक्रमाला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी, महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर, सचिव ऍड. एम. जी. पाटील, युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किनयेकर, सचिव शंकर कोनेरी यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *