बेळगाव : महिला आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक महिला आघाडीच्या कार्यालयात आज पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी उपमहापौर रेणू किल्लेकर या होत्या. 17 जानेवारी रोजी आपले सर्व बंद ठेवून हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यात यावा व सर्व महिलांनी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी 8.30 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन महिला आघाडी अध्यक्ष व माजी उपमहापौर सौ. रेणू किल्लेकर व माजी महापौर सरिता पाटील यांनी केले आहे. त्याचप्रमाणे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आलेल्या कोल्हापूर येथील धरणे आंदोलनास महिला आघाडीचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta