बेळगाव : दहावी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे. त्यासाठी या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेचे योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची ही अडचण ओळखून बाळगोपाळ एसएसएलसी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
रविवार दि. 19 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता व्ही. एस. पाटील हायस्कूल माच्छे येथे या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार असून ही व्याख्यानमाला दि. 16 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.
प्रत्येक रविवारी एका विषयावर तज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक 19 जानेवारी रोजी प्रथम भाषा मराठी या विषयावर लाल बहादूर शास्त्री विद्यालयाचे शिक्षक शिवाजी हसनेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक 25 रोजी गौंडवाड हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे शिक्षक सुनील लाड हे इंग्लिश या विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सरदार हायस्कूलचे रणजीत चौगुले हे समाज शास्त्र या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी माध्यमिक विद्यालय कर्ले हायस्कूलचे गजानन तांगणाकर हे विज्ञान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर दिनांक 16 फेब्रुवारी रोजी या मालिकेतील शेवटचे व्याख्यान निपाणीचे जोतिबा पाटील हे गणित या विषयाचे मार्गदर्शन करणार आहेत.
ही व्यानामाला प्रत्येक रविवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत होणार असून ही व्याख्यानमाला सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. तेव्हा मच्छे, पिरनवाडी, खादरवडी, संतीबस्तवाड, वाघावडे, रणकुंडये, किणये, कर्ले आणि परिसरातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा उपयोग करून घेऊन दहावीच्या वार्षिक परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे, असे आवाहन मराठी भाषा प्रेरणा मंचचे अध्यक्ष व बाळगोपाळ कंपनीचे संचालक प्रा. डॉ. गोपाळ पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta