बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये कै.भाई एन्. डी. पाटील यांना आदरांजली देण्यात आली. भाई एन्. डी. पाटील यांचे कार्य शाळेतील समाज विषय शिक्षक इंद्रजीत मोरे यांनी विशद केले. एन्. डी. पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ साली सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी १९५५ साली अर्थशास्त्र विषयात पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं होते.साताऱ्यातील १९५४ – १९५७ दरम्यान छत्रपती शिवाजी कॉलेज येथे प्राध्यापक आणि ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख देखील होते. इस्लामपूर येथील १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता. १९६२ साली पुणे विद्यापीठातूनच वकिलीचं शिक्षणही पूर्ण केले. अशाप्रकारे त्यांचा जन्म ते सामाजिक जीवनाचा प्रवास त्यांनी कथन केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta