येळ्ळूर : येळ्ळूर येथे नुकत्याच झालेल्या फुल्लपीच क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा ग्रामीण भागातील संघासाठी मर्यादित होती. या स्पर्धेत एकूण 40 संघांनी भाग घेतला होता. रविवार दि. 20/02/2022 रोजी अंतिम सामना खेळवण्यात आला. अंतिम सामन्यासाठी चांगळेश्वरी स्पोर्ट्स व बिडी संघ आमनेसामने होते. यात चांगळेश्वरी स्पोर्टसने श्री गणेश चषक पटकाविले. यावेळी बक्षीस वितरणाला येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, माजी ग्राम पंचायत सुळगे येळ्ळूर अरविंद पाटील, प्रथम पारितोषिक दिलेले प्रतीक मुगळीकर श्री गणेश प्लायवूड टिळकवाडी बेळगाव, द्वितीय पारितोषिक दिलेले आकाश मांडा तिरुपती बालाजी मार्बल खानापूर रोड मजगाव, येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्य, तसेच इतर मान्यवर व दानशूर वक्ती उपस्थित होते. यावेळी मालिकवीर-उमेश गोरल येळ्ळूर यांना मिळाला. उत्कृष्ट फलंदाज- परीक्षित मेनसे येळ्ळूर यांना उत्कृष्ट गोलंदाज- मंजू पाटील बिडी याना, उत्कृष्ट यष्टीरक्षक सदानंद पोटे याना, अंतिम सामन्याचा सामनावीर- डॉ. संतोष पाटील यांना देण्यात आले. चेतन हुंदरे व बाबू पिंगट यांनी सूत्रसंचालन केले व राजू उघाडे यांनी आभार मानले.
