बेळगाव : गोवा येथे इंटरस्कूल अंतर्गत घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेमध्ये भगतसिंग भारत गावडे याने 50 मीटर, 100 मीटर बटरफ्लाय गोल्ड मेडल. 50 मीटर व 100 फ्री स्टाईलमध्ये सिल्वर मेडल मिळवले. त्याला प्रमाणपत्र, मेडल, ट्रॉफी व रोख रक्कम 2000 बक्षीस तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये डिनर देऊन त्याला गौरविण्यात आले. तसेच वैयक्तिक चॅम्पियनशिप बक्षीस मा. श्री. दिगंबर कामत माजी मुख्यमंत्री गोवा आणि खासदार यांचा हस्ते देण्यात आले. त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सध्या तो बेळगाव येथील के.एल.ई. स्विंमर्स क्लब बेळगांवमध्ये प्रशिक्षण घेत आहे. या कामी त्याला अजिंक्य मेंडके, अजित जेंटीकट्टी, राजेश शिंदे, अतुल धुडूम, इम्रान सर, गोर्धन सर,सतीश यादव, संजू सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच त्याला के.एल.ई इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल कुवेंपूनगर बेळगाव स्टाफ यांचे सहकार्य लाभले. रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर, श्री. प्रभाकर कोरे (अध्यक्ष के.एल.ई सोसायटी) आणि उमेश कलघटगी यांनी पाठिंबा व प्रोत्साहन दिले. सध्या तो मराठी विद्यानिकेतन बेळगांव येथे इयता चौथी मध्ये शिक्षण घेत आहे.शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील वर्गशिक्षक बी.जी.पाटील तसेच मुख्याध्यापक गजानन सावंत, नारायण उडकेकर व सर्व शिक्षकांनी भगतसिंग गावडेच्या या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta