
बेळगांव : महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी मैदानावर दि. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला.
स्पर्धेचे उद्घाटनला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राजू भातकांडे, बाळु धोंगडी, शाळेच्या मुख्याध्यापिका अलका जाधव, फरिदा मिर्झा, क्रिडा शिक्षक बाबु देसाई उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. शालेय खेळाडूंनी शानदार पतसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. यानंतर शालेय क्रीडापटूंनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. खेळाडू आराध्या पालसिंग हिने सहभागी खेळाडूंना शपथ देवाविली. यानंतर कॉलनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषणे केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराध्या पालसिंग तर श्रेया पाटील यांनी आभार मानले. क्रीडा शिक्षक बापू देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला.
Belgaum Varta Belgaum Varta