
कित्तूर : खानापूरहून कित्तूरमार्गे हुबळीकडे जात असताना दुचाकीस्वाराची राष्ट्रीय महामार्ग 48 वर झाडाला धडकून 2 दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. संगोळ्ळी रायण्णा हुतात्मा दिनाचा एक भाग म्हणून खानापूर तालुक्यातील नंदगड गावात रायण्णा यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

संगोळ्ळी रायण्णा समाधीस्थळ दर्शनानंतर दोघेही तरुण जुन्या हुबळीकडे परत जात असताना कित्तूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि महामार्गालगतच्या झाडावर गाडी आदळली, यात 2 तरुण जागीच ठार झाले. रमेश आंदेप्पा अंबिगेर (20, जुने हुब्बळी, ईश्वर नगर) मदन चंद्रकांत मेटी (वय 20, रा. एस. एम. कृष्णानगर) अशी मृत तरुणांची नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय आरोग्य सामुदायिक केंद्रात पाठवण्यात आलेत. बेळगाव जिल्हा अधीक्षक भीमाशंकर गुळेद, बैलहोंगल डीवायएसपी, रवी नायक, कित्तूर सीपीआय शिवानंद गुडागनट्टी, पीएसआय प्रवीणा गंगोल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी कित्तूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta