बेळगाव : बेळगाव परिसरातील विविध संघ-संस्थांमध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
येळ्ळूर ग्राम पंचायतीचा 76 वा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण; स्वच्छता अभियान निष्ठावंत कर्मचाऱ्याकडून
बेळगाव : रविवार दिनांक 26/01/2025 रोजी येळ्ळूर ग्रामपंचायतमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ग्राम पंचायत अध्यक्षा श्रीमती लक्ष्मी मासेकर व उपाध्यक्ष श्रीमान प्रमोद पाटील, ग्राम पंचायत पीडिओ तसेच सेक्रेटरी आणि ग्राम पंचायतचे सर्व सदस्य व कर्मचारी तसेच श्री शिवाजी विद्यालय, चांगळेश्वरी हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूलचे विद्यार्थी व एन सी सी पथक, अंगणवाडी विद्यार्थी व कार्यकर्ते त्याचप्रमाणे आशा वर्कर उपस्थित होते. याप्रसंगी ग्राम पंचायतीचे अधिकारी व ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या सूचनेनुसार ग्राम पंचायतीच्या स्वच्छता अभियानामध्ये कचरा गाडी चालक तसेच एक प्रामाणिक निष्ठावंत कर्मचारी श्री. संतोष महादेव हूव्वानावर यांना 76वा प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येत असे पण यंदाचा ध्वजारोहण एका सामान्य कर्मचाऱ्याकडून केल्याचा आनंद सर्वाना होत आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये नमूद केलेल्या समानतेचा हक्क, हे आज येळ्ळूर ग्राम पंचायती मध्ये दिसून आले. यामुळे गावामध्ये याचे कौतुक होत आहे. यावेळी कर्नाटक दलित संघर्ष समिती शाखा येळ्ळूरचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. या प्रसंगी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.
महिला आघाडी को-ऑपरेटिव्ह सोसायटी
महिला आघाडी को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गणपत गल्ली येथील कार्यालयात महिला आघाडी को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन रेणू किल्लेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संगीत शिक्षक सहदेव कांबळे उपस्थित होते. महात्मा फुले पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाहुण्यांचे आगमन झाले. प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यानंतर सहदेव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संगीत विभागातर्फे राष्ट्रगीत, प्रस्तावना सादरीकरण, झेंडा गीत, समूहगीत घेण्यात आले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून पथसंचलन करण्यात आले. आज आपला देश वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाटचाल करत आहे, प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सहदेव कांबळे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. बालवाडीच्या शिशु वर्गातील रिया नंदकुमार किरमटे, मनस्वी महेश शिंदे, मयंक दीपक पाटील या विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले. कल्याणी हलगेकर, उर्वी पाटील, सायली भोसले, अनन्या पाटील या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भाषांत आपले विचार मांडले. यानंतर शारीरिक विभागाकडून शारीरिक कसरती घेण्यात आल्या. इयत्ता पहिली व दुसरीसाठी एरोबिक्स, तिसरी व चौथी, सहावीसाठी मास पीटी, सातवी आठवीतर्फे लेझीम सादरीकरण, पाचवीतर्फे डंबेल्स आणि रिंग सादरीकरण करण्यात आले. शाळेच्या 1999- 2000 या बॅचचे माजी विद्यार्थी ज्ञानेश ओऊळकर, विशाल बाळेकुंद्री, चंदन जाधव, शामल भातकांडे, मयूर कामत, आरती चिकोर्डे व इतर सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, प्रतापसिंह चव्हाण, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, बालवाडी प्रमुख सीमा कंग्राळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख शैला पाटील व स्नेहल पोटे, शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश हगीदळे यांनी केले.
आधार सोसायटी तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा
बेळगाव : महाद्वार रोड स्थित श्री आधार मल्टीपर्पज सौहार्द सोसायटीच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. चेअरमन सुभाष देसाई यांनी ध्वजारोहण केले तर संस्थापक अनंत लाड यांनी राष्ट्रपीता गांधीजी यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण केला. अनंत लाड व सुभाष देसाई यांची भाषणे झाली. व्हॉइस चेअरमन बाळासाहेब चोपडे, संचालक सुनील चौगुले, आनंद बाचुळकर, महादेव ठोकणेकर, व्यवस्थापक के बी संकनावर व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
सुभाष चंद्र नगर नागरिक संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा
बेळगाव : सुभाष चंद्र नगर नागरिक संघटनेच्या वतीने आझाद बागेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. उपाध्यक्ष राजेश तेंडुलकर यांनी स्वागत चंद्रशेखर इट्टी यांनी पाहुणे सौ शीला व दिलिप हंगिरगेकर यांना सन्मानित केले.
हंगिरगेकर यांच्या हस्ते ध्जारोहण करण्यात आले. मंगीराम जांगरा यांनी मिठाई वाटली तर अनंत सावंत यांनी चहा व नाश्टाची व्यवस्था केली. संघटनेचे माजी अध्यक्ष राजाभाऊ चौगुले, आप्पासाहेब गुरव, प्रकाश गोखले, पदाधिकारी गौरव पटेल, गजाननराव राणे, शिवानी करडे, सीमा करडे व इतर उपस्थित होते. विद्या ईट्टी यांनी सूत्रसंचालन केले.
नवहिंद क्रीडा केंद्राच्या वतीने 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
येळ्ळूर : नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर यांच्या वतीने 76 वा प्रजासत्ताक दिन नवहिंद भवन येळ्ळूर येथे संपन्न झाला. प्रारंभी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष श्री. शिवाजी सायनेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पूजन करुन ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी नवहिंद को ऑप. क्रेडीट सोसायटीचे चेअरमन श्री. प्रकाश अष्टेकर यांनी प्रजास्ताक दिनाबद्दल विचार मांडले. या कार्यक्रमास नवहिंद क्रीडा केंद्राचे कार्यकर्ते, नवहिंद महिला प्र्बोधन संघ, दि नवहिंद को ऑप. क्रेडीट सोसायटी, न्यु नवहिंद मल्टीपर्पज मल्टी स्टेट सोसायटी, प्रियदर्शिनी नवहिंद महिला मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. श्री. बाळू दणकारे यांनी सूत्रसंचालन केले.