बेळगाव : प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यामध्ये आज (बुधवार) मौनी अमावस्येच्या पवित्र स्थानानिमित्त संगमावर प्रचंड गर्दी झाल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत 17 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर शंभरहून अधिक भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बेळगावच्या ही चार भाविकांचा समावेश असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बेळगावचे 9 भक्त एकत्र प्रयागराजला गेले होते. त्यापैकी चौघेजण चेंगराचेंगरीनंतर बेपत्ता आहेत. त्या चंद्राचेंगरीत 17 जण ठार आणि शंभरहून अधिक जखमी झाले आहेत. या मृतांमध्ये बेळगावच्या चार भाविकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही. मृतांची नावं अजून जाहीर न झाल्याने बेपत्ता भाविक जखमी आहेत की मृत झालेत हे समजू शकलेले नाही.
प्रयागराजला गेलेल्या बेळगावच्या भक्तांपैकी एका महिलेने सांगितले की, आम्ही नऊ जण कुंभमेळ्यासाठी आलो होतो. मात्र चेंगराचेंगेनंतर चौघेजण बेपत्ता आहेत, त्यांचा अजून कुठेच शोध लागलेला नाही.