Wednesday , March 4 2026
Breaking News

टिप्पर – दुचाकी अपघातात आंबेवाडी येथील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

Spread the love

 

बेळगाव : अलतगा जवळील खडीमिशन दरम्यान आज झालेल्या अपघातात आंबेवाडी गावातील 24 वर्षीय योगेश संभाजी न्हावी आणि 27 वर्षीय नितेश वैजू तरळे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघेही कुटुंबांचे एकुलते एक पुत्र होते. सदर अपघात सायंकाळी 4.30 ते 5 वाजता झाला असून आंबेवाडी ग्रामस्थांसाठी ही दुःखद घटना आहे.
वाळू वाहून नेणारा टिप्पर चालत्या दुचाकीवर आदळून दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरालगत असलेल्या अलतगे येथील खडीमिशन क्रॉसजवळ घडली. दोन्ही दुचाकीस्वारांच्या मृतदेहाचा चेंदामेंदा झाला होता. याशिवाय हा अपघात इतका भीषण होता की टिप्परखाली अडकलेले मृतदेह सहजासहजी काढता येत नव्हते. अपघात नेमका कसा झाला हे समजू शकले नाही, पण दोन्ही तरुण आणि दुचाकी टिप्परखाली सापडली होती.
काकती पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेले असून पुढील तपास सुरू आहे. उद्या सकाळी 11 वाजता आंबेवाडी गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
आंबेवाडी येथील कुमार नितेशच्या पश्चात आई-वडिल, दोन बहिणी असा परिवार आहे तर कुमार योगेशच्या पश्चात आई व एक बहिण असा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *