बेळगाव : महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करणाऱ्या तारांगणतर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना निबंधाचा सराव व्हावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे.
निबंध स्पर्धेचे विषय : १. राष्ट्रीय एकात्मता, २. माझा आवडता समाज सुधारक, ३. ग्रंथ हेच गुरु, ४. मोबाईल शाप की वरदान,
५. आई एक महान दैवत, ६. प्रदूषण एक समस्या, ७. मराठी असे आमुची मायबोली असे आहेत.
निबंध स्पर्धेचे नियम : १) बेळगाव जिल्ह्यातील इयत्ता १० वी चे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. २) विद्यार्थ्यांनी सोबत दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे. ३) निबंध २० ओळीचा लिहावा. निबंध सोबतच विद्यार्थ्यांनी आपले नाव, शाळेचे नाव, पत्ता व फोन नंबर असावा. ४) या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही. ५) ही ऑनलाईन स्पर्धा असून विद्यार्थ्यांनी निबंध लिहून त्याचा फोटो दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ ते ५ मार्च २०२२ या कालावधीमध्ये फोन नंबर : ९३४१४ १११८६, ९९०११ ३७९८१, या पैकी एका क्रमांकावर पाठवण्याचे आहेत.६) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. ७) स्पर्धकाने https://www.facebook.com/Sandeshnewsbelgaum या फेसबुक पेजला लाईक करणे अनिवार्य आहे.
महत्वाची सूचना
विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी जरी एक विषय निवडला असला तरी वार्षिक परीक्षेच्या दृष्टीने सर्व विषय महत्वाचे आहेत. त्यासाठी सर्व निबंधांचा सराव करावा.
बार असोसिएशन उपाध्यक्ष व समिती नेते ऍड. सुधीर चव्हाण व बेळगावमधील उद्योजक महादेव चौगुले या स्पर्धेचे प्रायोजक आहेत.
निबंध स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तारांगणच्या कार्यकारिणीने केले आहे.