बेळगाव : प्रयागराज महाकुंभ मेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या बेळगावातील चार भाविकांचे मृतदेह बेळगावला पाठवण्यात आले आहेत.
बेळगाव येथील अरुण कोपर्डे (वय 61) व महादेवी भावनूर (वय 48) यांचे पार्थिव बेळगाव येथील सांबरा विमानतळावर सायंकाळी पाच वाजता दाखल होणार आहे.
तर मेघा हत्तरवठ (२४), ज्योती हत्तरवठ (४४) या आई व मुलीचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह दिल्लीहून गोवा आणि गोव्याहून बेळगावला आणले जात असल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्ली – बेळगाव इंडिगोच्या विमानाने दोघांचे मृतदेह दिल्लीहून गोव्याला रवाना होत असल्याने रात्री आठच्या सुमारास मेघा आणि ज्योती या दोघांचेही मृतदेह गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे आणि मध्यरात्री बेळगावला आणण्यात येतील.