बेळगाव : प्रयागराज यात्रेहून बेळगावला परतताना बेळगाव देशपांडे गल्लीतील एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समजते. रवि जठार (६१) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते वृत्तपत्र विक्रेते होते.
प्रयागराजहून बेळगावला परत येत असताना रेल्वेत हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. बेळगावातील एकूण पाच भाविकांचा मृत्यू झाल्याने बेळगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मध्यरात्री साधारण 2 च्या सुमारास मृतदेह बेळगावात आणण्यात येईल. सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.