Wednesday , March 4 2026
Breaking News

कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावच्या ग्रामपंचायत अध्यक्षा कैसर बंदे नवाज सय्यद यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला. शुक्रवार दिनांक ३१/०१/२०२५ रोजी ३४ सभासदांपैकी २७ ग्रा.पं. सभासदांनी ग्रामपंचायत अध्यक्षा कैसर बंदेनवाज सय्यद विरोधात हातवर करून आपले मत नोंदवून अविश्वास प्रस्ताव मंजूर केला तर ७ ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित नव्हते, असे निवडणूक अधिकारी तसेच बेळगाव उपजिल्हाधिकारी दिनेश कुमार मीना (आय.ए.एस) यांनी बोलताना सांगितले.

तसेच कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत अध्यक्षांचे स्थान रिक्त आहे. ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल व पुढील नवीन अध्यक्षांसाठी आठ ते दहा दिवसात निवडणूक घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

अविश्वास प्रस्ताव करण्यामागचे कारण ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील व अनिल पावशे यांनी सांगितले की, कंग्राळी बुद्रुक गावचा विकास थांबला होता. गेले ६ ते ७ महिने अध्यक्ष ग्रामपंचायत मध्ये आल्या नाहीत. या कारणाने गावातील संपूर्ण विकास ठप्प झाला होता. कोणतीही काम पूर्ण झाले नाही. त्यासाठी सय्यद यांना अध्यक्षपदावरून वजा केल्या असल्याचे माहिती त्यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *