बेळगाव : तामिळनाडू राज्य महिला क्रिकेट संघाचे जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक आणि बेळगावचे अष्ठपैलू क्रिकेटपटू केनेडी फिल्बर्ट यांनी अनगोळ येथील एसकेई प्लॅटिन ज्युब्ली मैदानाला भेट दिली. प्रसंगी क्रिकेट प्रशिक्षक रविशंकर मालशेट यांनी केनेडी फिल्बर्ट यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी क्रीडा शिक्षक विवेक पाटील यांनी केनेडी फिल्बर्ट यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन स्वागत केले. याप्रसंगी केनेडी फिल्बर्ट यांनी खेळपट्टी पाहून समाधान व्यक्त करत मार्गदर्शन केले. याप्रसंगी बाळकृष्ण पाटील, राहुल नाईक, प्रमोद जपे, ज्योतिबा पवार, दत्तप्रसाद जांबवलेकर, सोमनाथ सोमनाचे, राजन, प्रभाकर कंग्राळकर आदी मान्यवर उपस्थित होते.