बेळगाव : परिवहन महामंडळाच्या बसेसवर कन्नड फलकाबरोबरच मराठी फलकही लावण्यात यावेत, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने निवेदनाद्वारे परिवहन खात्याकडे करण्यात आली आहे.
अल्पसंख्यांक कायद्याची अंमलबजावणी करावी आणि प्रत्येक बसेसवर कन्नड फलकाबरोबरच मराठी फलकही लावण्यात यावे. या मागणीसाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे.
तसेच या संदर्भात अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा करून बैठकही बोलावण्यात आल्या मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पहायला मिळत आहे. यासंदर्भात राज्य सरकारचे परिपत्रक दाखविण्यात येत आहे. मात्र बेळगाव हे सीमेवर असल्याने बेळगावमध्ये मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे. आणि या सीमेवरती अल्पसंख्यांक भाषिकांसाठी काही सुरक्षा आणि अधिकार आहेत. त्यानुसार कायद्याने भाषिक अल्पसंख्यांक असलेल्या नागरिकांनी केलेल्या मागणीची पूर्तता व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
बेळगावमध्ये 21 टक्के मराठी भाषिक आहे. पंधरा टक्क्यांच्या वर जर एका जिल्ह्यात नागरिक असतील तर त्या ठिकाणी राज्यभाषा बरोबरच स्थानिक भाषेचाही अधिकार देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व बसेस सार्वजनिक ठिकाणी कन्नड फलकाबरोबरच मराठी फलक लावण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र याबाबत अनेक अधिकाऱ्यांनी विचारविनिमय करू आणि तोडगा काढून अशी उत्तर देत आहेत त्यामुळे मराठी भाषिकांचे अधिकार काढून घेतला जात आहे. अल्पसंख्यांक भाषिकांच्या अधिकाराची अंमलबजावणी होत नसेल तर रस्त्यावर उतरून आंदोलने आणि मोर्चे काढू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण- पाटील, विकास कलघटगी, महेश जुवेकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta