
बेळगाव : दि. 2 फेब्रुवारी रोजी वनिता विद्यालय येथे झालेल्या बेळगाव तालुका शिक्षक सोसायटी शिवाजीनगर, बेळगाव या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर शाळेच्या सहशिक्षिका श्रीमती ए. वाय. मेणसे यांची संचालक पदी निवड झाली. बेळगाव तालुका शिक्षक सोसायटी शिवाजीनगर बेळगाव या सोसायटीच्या संचालक पदांची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत श्री. एस्. जी. करंबळकर गुरु स्पंदन पॅनलतर्फे श्रीमती ए. वाय. मेणसे या सामान्य महिला गटातून उमेदवार होत्या. या निवडणुकीमध्ये यांनी 503 मते घेऊन विजय मिळविला. गुरु स्पंदन पॅनलने 15 पैकी 11 जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा बाजी मारली. त्यांच्या या विजयाबद्दल शाळेच्या एस्.डी.एम्.सी. आणि शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्षा श्रीमती रूपा श्रीधर धामणेकर, उपाध्यक्ष श्री. ज्योतीबा उडकेकर, श्री. मूर्तीकुमार माने, जोतिबा पाटील, शशिकांत पाटील, विजय धामणेकर, दिनेश लोहार, मारुती यळगूकर, मुख्याध्यापक श्री. आर. एम्. चलवादी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta